23 November 2024 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Bonus Shares | फ्री शेअर्सचा पाऊस पडणार! कंपनीकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, अल्पावधीत मोठी कमाई होईल

Bonus Shares

Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे. आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 284.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनी अंश )

सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. या कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रति शेअर 1 रुपये होईल. स्टॉक स्प्लिटनंतर सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनी आपल्या शेअरधारकांना 1 रुपये दर्शनी मुल्य असलेले 7 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. या कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूची पात्रता निश्चित करण्यासाठी 8 मार्च 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.

शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये सनशाइन कॅपिटल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 278.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 48 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 552 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 278.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 34.49 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 362.76 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Sunshine Capital Share Price 04 March 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x