23 November 2024 10:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Tanla Share Price | करोडपती बनवणारा 40 रुपयाचा शेअर, कमी कालावधीत गुंतवणूकदार मालामाल होतं आहेत

Tanla Share Price

Tanla Share Price | भारतीय शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक आहे, तानला प्लॅटफॉर्म लिमिटेड. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2500 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मार्च 2019 मध्ये तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

8 मार्च 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 37.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 2 मार्च 2024 रोजी तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 979.30 रुपये किमतीवर पोहचले होते. आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 1.21 टक्के घसरणीसह 968 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मार्च 2019 ते जून 2020 दरम्यान तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर 40 रुपये ते 70 रुपये दरम्यान ट्रेड करत होते. जुलै 2020 पासून या कंपनीचे शेअर्स वाढायला सुरुवात झाली. जुलै 2020 मध्ये तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 100 रुपये किमतीच्या पार गेले होते. तर ऑगस्ट 2020 मध्ये तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअरने 200 रुपये किंमत स्पर्श केली होती. डिसेंबर 2020 पर्यंत या कंपनीचे शेअर्स 800 रुपये किमतीवर पोहचले होते.

सप्टेंबर 2021 पर्यंत तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 800-900 रुपये किमतीच्या दरम्यान ट्रेड करत होते. परंतु ऑक्टोबर 2021 पासून हा स्टॉक पुन्हा रॉकेट वेगाने वाढू लागला. ऑक्टोबर 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 900 रुपये किमतीवर पोहचले होते. तर डिसेंबर 2021 पर्यंत शेअरची किंमत 1800 रुपयेच्या पुढे गेली होती. यासह जानेवारी 2022 मध्ये तानला प्लॅटफॉर्म स्टॉकने 2000 रुपये किंमत स्पर्श केली होती. तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1317.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 493 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tanla Share Price NSE Live 04 March 2024.

हॅशटॅग्स

Tanla Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x