23 November 2024 5:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा
x

Suzlon Share Price | सलग 5 दिवस घसरणारा सुझलॉन शेअर 4.91% वाढला, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के लोअर सर्किटसह 38.53 रुपये किमतीवर पोहोचले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 2 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 50.72 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 25 टक्क्यांनी घसरले आहेत.

मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. मात्र आज गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.75 टक्के वाढीसह 40.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील काही दिवसापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत होती, कारण पवन ऊर्जा क्षेत्रातील वाढीसाठी भारत सरकार पुन्हा एकदा “रिव्हर्स ऑक्शन” प्लॅन आणण्याचा विचार करत आहे. केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय सर्व अक्षय ऊर्जा कंपन्यांसाठी पवन ऊर्जा क्षमतेचा लिलाव करताना “रिव्हर्स ऑक्शन” लागू करण्याचा विचार करत आहे. नुकताच केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने NTPC, NHPC, SJVN आणि इतर PSU कंपन्यांना पवन ऊर्जा लिलावात कमी सबस्क्रिप्शन आणि उच्च दराने बोली लावल्याबाबत नोटीस पाठवली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने रिव्हर्स ऑक्शनचा पूर्वीचा निर्णय पुनर्संचयित केला असून प्लेन व्हॅनिला विंड टेंडरचा किमान आकार 600 MW मर्यादित केला आहे. ऊर्जा मंत्रालयाने अक्षय ऊर्जा लिलाव आयोजित करणाऱ्या एजन्सींना संपूर्ण भारतात लिलाव बोली आयोजित करण्याच्या सूचना केल्या आहेत. रिव्हर्स ऑक्शन सिस्टम अंतर्गत, कोणत्याही बोलीला आव्हान दिले जात नाही तोपर्यंत बोलीदार एकमेकांविरुद्ध बोली लावत असतात. यामुळे पवन ऊर्जा क्षमतेचा पूर्ण फायदा घेता येत नाही. असे ऊर्जा मंत्रालयाच्या निदर्शनात आले आहे.

तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 54 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. जेएम फायनान्शियल फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 54 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 62 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 07 March 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x