26 November 2024 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Tata Power Share Price | अल्पावधीत मजबूत परतावा देतोय टाटा पॉवर शेअर, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचले होते. मात्र ही तेजी इथेच थांबली नाही. तर गुरूवारी देखील टाटा पॉवर स्टॉक 9 टक्के वाढीसह 433.20 रुपये किमतीवर पोहोचला होता. ( टाटा पॉवर कंपनी अंश )

2024 या वर्षात टाटा पॉवर स्टॉक 30 टक्के वाढला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.35 लाख कोटी रुपये आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 8.48 टक्के वाढीसह 428.45 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने गुरुवारी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी टाटा पॉवर कंपनीला वीज दरात सरासरी 24 टक्के वाढ करण्याची मंजूरी दिली आहे. सुधारित दर 1 एप्रिल 2024 पासून लागू होतील. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते. अँटिक ब्रोकिंग फर्मने टाटा पॉवर शेअरवर 450 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

28 मार्च 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 182.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 102 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 61 टक्के नफा कमावून दिला आहे.

टाटा पॉवर कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत 2.28 टक्के वाढीसह 1,076.12 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,052.14 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. टाटा पॉवर सोलर सिस्टीम्स लिमिटेड कंपनीने निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना आर्थिक समाधान देण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियासोबतच्या कराराचे नूतनीकरण करून व्यवसाय विस्तार करण्याची घोषणा केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 08 March 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x