22 November 2024 1:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

KPI Green Energy Share Price | कुबेर कृपा असलेला शेअर खरेदी करा, 1 वर्षात दिला 495% परतावा, पुढेही लॉटरी लागेल

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः श्रीमंत बनवले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला होता. ( केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश )

सोमवारी केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच एक 305MW क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे काम मिळाले आहे. आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 1,632.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

नुकताच आदित्य बिर्ला समूहाच्या 2 उपकंपन्यांनी केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला गुजरात राज्यात हायब्रीड विंड आणि सोलर वीज निर्मिती प्रकल्प उभारायचा आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला अभियांत्रिकी, बांधकाम, कमिशनिंग सेवा तसेच पुरवठा, लोडिंग अनलोडिंग, वाहतूक आणि बांधकामाची कामे पार पाडावी लागणार आहे.

कंपनीला हे काम आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पूर्ण करायचे आहे. मागील आठवड्यात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीला 9.40 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम मिळाले होते. तर फेब्रुवारी महिन्यात या कंपनीला 1.5 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम मिळाले होते.

डिसेंबर 2023 तिमाहीत केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने 47 टक्क्यांच्या वाढीसह 50.70 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत कंपनीने 331.31 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 179.66 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 206 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 495.70 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 123 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share Price NSE Live 12 March 2024.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x