25 November 2024 3:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
x

Zomato Share Price | कमाईची मोठी संधी! झोमॅटो शेअर अल्पावधीत देईल 35 टक्के परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या

Zomato Share Price

Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आहे. परकीय ब्रोकरेज फर्म HSBC च्या तज्ञांनी झोमॅटो कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस वाढवली आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, झोमॅटो स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्क्यांच्या घसरणीसह 149 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 2.62 टक्के वाढीसह 152.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( झोमॅटो कंपनी अंश )

HSBC फर्मच्या तज्ञांच्या मते, झोमॅटो कंपनीला पुढील काळात ऑनलाईन मार्केटमधील वाढीचा फायदा होणार आहे. ब्रोकरेज फर्म कंपनीने झोमॅटो स्टॉकला ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. HSBC फर्मने झोमॅटो कंपनीच्या स्टॉकवर 200 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. एचएसबीसी ब्रोकरेज फर्म ब्लिंकिट कंपनीच्या व्यवसायाबद्दल खूप आशावादी आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत झोमॅटो कंपनीचा व्यवसाय प्रोफीटेबल होईल, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

झोमॅटो कंपनीचा ऑर्डर वाढीचा दर 21.4 टक्क्यांवरून वाढून 25.4 टक्केवर आला आहे. पुढील पाच वर्षांत ब्लिंकिट कंपनीच्या जाहिरात उत्पन्नात मजबूत वाढ होण्याचा अंदाज एचएसबीसी फर्मने व्यक्त केला आहे. मागील 1 वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील 3 महिन्यांत झोमॅटो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत झोमॅटो स्टॉक 49 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 174 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price NSE Live 14 March 2024.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x