25 November 2024 4:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Bonus Shares | सुवर्ण संधी! फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, अप्पर सर्किट हीट

Bonus Shares

Bonus Shares | मागील काही दिवसापासून विक्रीच्या दबावात असलेल्या पैसालो डिजिटल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अवघ्या 3 दिवसात या स्टॉकमध्ये 41 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. ( पैसालो डिजिटल कंपनी अंश )

गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी पैसालो डिजिटल कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 123.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी पैसालो डिजिटल स्टॉक 9.97 टक्के वाढीसह 135.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पैसालो डिजिटल कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांच्या घसरणीसह 112 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता पैसालो डिजिटल कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 20 मार्च 2024 हा दिवस निश्चित केला आहे.

यापूर्वी पैसालो डिजिटल कंपनीने मे 2010 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होत. मागील एका वर्षात पैसालो डिजिटल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 118 टक्के परतावा कमावून दिला आहे. 14 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 56.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 14 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 123.20 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 199.25 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 42.01 रुपये होती.

मागील 3 दिवसात पैसालो डिजिटल कंपनीच्या शेअर्समध्ये 41 टक्के घसरण पहायला मिळाली होती. 11 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 178.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 13 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 112 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने या कंपनीला कर्जावर वार्षिक 125 टक्केपेक्षा जास्त दराने व्याज आकारणी केल्याच्या आरोपात नोटीस जारी केली होती. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने भारतीय रिझर्व्ह बँक आणि शेअर बाजार नियामक सेबीला देखील नोटीस धाडली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Paisalo Share Price NSE Live 15 March 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x