25 November 2024 9:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

HAL Share Price | भरवशाचा HAL कंपनीचा शेअर पुन्हा तेजीत येणार, ऑर्डरबुक मजबूत झाली, टार्गेट प्राईस किती?

HAL Share Price

HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुफान तेजीत वाढत होते. मात्र आज गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधे प्रॉफिट बुकींग सुरू केली आहे. नुकताच एचएएल कंपनीला 8073 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी प्रसिद्ध होताच गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात केली. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचएएल स्टॉक 4.18 टक्के वाढीसह 3167.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. इंट्रा-डेमध्ये स्टॉक 4.53 टक्क्यांच्या वाढीसह 3177.70 रुपये किमतीवर पोहोचला होता. आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी एचएएल स्टॉक 4.89 टक्के घसरणीसह 3,011 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला भारतीय डिफेंस मिनिस्ट्रीने 8,073 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. या ऑर्डर अंतर्गत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला इंडियन आर्मी आणि इंडियन कोस्ट गार्डसाठी 34 एडवांस्ड लाइट हेलीकॉप्टर्स ध्रुव एमके-3 बनवायची जबाबदारी देण्यात आली आहे. या ऑर्डरमुळे 200 पेक्षा अधिक MSME आणि 70 पेक्षा अधिक लोकल वेंडर्सला इक्विपमेंट सप्लाई करण्याचे काम मिळणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली.

भारतीय लष्करासाठी जे आवृत्ती एडवांस्ड लाइट हेलीकॉप्टर्स ध्रुव MK-3 तयार करण्यात येणार आहे, ते मुख्यतः शोधकार्य, बचाव, सैन्याची हालचाल, अंतर्गत मालवाहतूक, अपघातग्रस्त ठिकाणी मदत करणे, इत्यादी कठीण कामासाठी डिझाइन करण्यात आलेले आहे. हे हेलीकॉप्टर्स सियाचीन ग्लेशियर आणि लडाख सारख्या उंच ठिकाणांवरही आपल्या पूर्ण क्षमतेने काम करू शकतात.

या व्यतिरिक्त भारतीय तटरक्षक दलासाठी तयार करण्यात येणारे एडवांस्ड लाइट हेलीकॉप्टर्स ध्रुव MKIIIMR हे मुख्यतः शोधकार्य, बचाव, रॅपलिंग ऑपरेशन्स, कार्गो आणि कर्मचारी वाहतूक, प्रदूषण प्रतिसाद आणि वैद्यकीय अपघाती कार्य करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. हे हेलीकॉप्टर्स समुद्र आणि जमिनीवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या पूर्ण क्षमतेत कार्य करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price NSE Live 15 March 2024.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x