23 November 2024 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Indo Count Share Price | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 83000 रुपयांवर दिला 1 कोटी रुपये परतावा, खरेदी करणार?

Indo Count Share Price

Indo Count Share Price | इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने दीर्घ काळातच नाही तर अल्पावधीत देखील आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. सध्या अनेक ब्रोकरेज फर्म इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. ( इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनी अंश )

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 8.26 टक्क्यांच्या वाढीसह 319.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी इंडो काउंट इंडस्ट्रीज स्टॉक 2.58 टक्के वाढीसह 328.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

11 वर्षापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 83000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मुल्य एक कोटी रुपयेपेक्षा जास्त झाले आहेत. 8 मार्च 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 328 रुपये किमतीवर पोहचला आहे.

मागील वर्षी 28 मार्च 2023 रोजी इंडो काउंट इंडस्ट्रीज स्टॉक 101.15 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर अवघा 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 260 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 26 फेब्रुवारी 2024 रोजी इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 364.60 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक पातळीवर पोहोचले होते.

इंडो काउंट इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी बेडशीट आणि ब्लँकेट निर्यातक कंपनी आहे. या कंपनीची उत्पादन क्षमता 153 दशलक्ष मीटरवर पोहोचली आहे. या कंपनीचा 95 टक्के महसूल फक्त निर्यात व्यवसायातून येतो, त्यापैकी 74 टक्के कमाई अमेरिकन बाजारातून होते.

इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीने मजबूत ग्राहक आधार, उत्पादन विस्तार क्षमता, नवीन परदेशातील बाजारपेठांमध्ये प्रवेश, प्रीमियम उत्पादनांवर वाढता फोकस यामुळे आर्थिक वर्ष 2024 च्या शेवटच्या तिमाहीत 1,000 कोटी रुपये संचयी भांडवलाच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन वर्षात मार्जिनमध्ये वाढ करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.

इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचा व्यवसाय यूएस मार्केटमध्ये वाढत आहे. तसेच भारत आता UK आणि EU सोबत मुक्त व्यापार करार करण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म नुवामाने 13 मार्च 2024 रोजी आपल्या अहवालात इंडो काउंट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. तज्ञांनी या स्टॉकवर 430 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indo Count Share Price NSE Live 15 March 2024.

हॅशटॅग्स

Indo Count Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x