23 November 2024 10:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रास्ट्रक्चर शेअर मालामाल करणार, मिळेल 58 टक्के परतावा, टार्गेट प्राइस अपग्रेड

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊस अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या तज्ञांनी IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी )

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स स्टॉक 2.23 टक्के वाढीसह 57.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

Antique Stock Broking फर्मने IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअरवर 88 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. 14 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 56 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 58 टक्के अधिक वाढू शकतो. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव असताना देखील IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स स्टॉक 7.5 टक्क्यांनी वाढला होता.

मागील एका वर्षात IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 40 टक्के मजबूत झाली आहे. 2024 या वर्षात IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स स्टॉक 36 टक्के मजबूत झाला आहे.

IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 71.95 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 22.56 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 34,639 कोटी रुपये आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने GIC कडून InvIT मधील 24 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. यामुळे IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्मने आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 84 रुपयेवरून 88 रुपये अपग्रेड केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price NSE Live 16 March 2024.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x