23 November 2024 12:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

IFCI Share Price | 4 रुपयाच्या शेअरने मालामाल केलं, अल्पावधीत दिला 875 टक्के परतावा, खरेदी करणार?

IFCI Share Price

IFCI Share Price | आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 वर्षांत जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मार्च 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 40 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहेत. ( आयएफसीआय कंपनी अंश )

मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 875 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 4 वर्षापूर्वी आयएफसीआय स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 97,500 रुपये झाले असते. आज मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी आयएफसीआय स्टॉक 2.07 टक्के घसरणीसह 37.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयएफसीआय लिमिटेड ही कंपनी मुख्यतः नॉन-बँकिंग वित्तीय सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी ऊर्जा क्षेत्र, अक्षय ऊर्जा, दूरसंचार, रस्ते, तेल आणि वायू, बंदरे, विमानतळ इत्यादीं उद्योगांना वित्तीय सेवा प्रदान करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना स्टॉक ब्रोकिंगशी संबंधित सुविधा देखील प्रदान करते.

मागील एका वर्षात आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 278 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 यावर्षात आयएफसीआय स्टॉक आतापर्यंत 34 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. सध्या आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 71.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 46 टक्के कमजोर झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 9.03 रुपये होती.

फेब्रुवारी 2024 या महिन्यात आयएफसीआय कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 19.26 टक्के परतावा कमावला होता. तर जानेवारी 2024 या महिन्यात कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 5.3 टक्के वाढली होती. डिसेंबर 2024 या तिमाहीत आयएफसीआय कंपनीला 10 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. तर सप्टेंबर 2024 च्या तिमाहीत हा कंपनीने 83.7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2024 तिमाहीत आयएफसीआय कंपनीने 214.70 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFCI Share Price BSE Live 19 March 2024.

हॅशटॅग्स

IFCI Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x