29 April 2025 4:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC Yes Bank Share Price | पेनी स्टॉकबाबत अलर्ट, गुंतवणूकदारांनी शेअर BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | सरकारी कंपनीच्या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांना एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER
x

Piramal Pharma Share Price | पिरामल फार्मा शेअर 45 टक्केपर्यंत परतावा देऊ शकतो, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसबद्दल काय म्हटले?

Piramal Pharma Share Price

Piramal Pharma Share Price | पिरामल फार्मा कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या अहवालानंतर पिरामल फार्मा कंपनीचे अचानक तेजीत आले होते. जेफरीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, आर्थिक वर्ष 2025 पर्यंत कंपनीच्या महसुलात मजबूत वाढ होणे अपेक्षित आहे. ( पिरामल फार्मा कंपनी अंश )

त्यामुळे अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांच्या मते, पिरामल फार्मा स्टॉक पुढील काळात 170 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. आज बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी पिरामल फार्मा स्टॉक 0.54 टक्के घसरणीसह 119.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तज्ञांच्या मते, पिरामल फार्मा कंपनीच्या वार्षिक महसुल संकलनात आर्थिक वर्ष 2025 पर्यंत 12.5 टक्के वाढ होऊ शकते. जर पिरामल फार्मा कंपनी 15 टक्के वार्षिक महसूल वाढ साध्य करण्यात यशस्वी ठरली, तर आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात 45 टक्के वाढ होऊ शकते. हा अहवाल प्रकाशित होताच पिरामल फार्मा कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्के वाढीसह 125.05 रुपये या आपल्या इंट्रा-डे उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. पिरामल फार्मा कंपनीचे बाजार भांडवल सध्या 16,000 कोटी रुपये आहे.

सध्या पिरामल फार्मा कंपनी आर्थिक वर्ष 2025 आणि 2026 साठी अनुक्रमे 14x आणि 12x EBITDA मल्टिपलच्या मूल्यांकनावर व्यवसाय करत आहे. कंपनीच्या कमाईत आणि कामगिरीत सुधारणा झाल्याने पिरामल फार्मा स्टॉकमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत.

Jefferies ने आपल्या अहवालात अपेक्षा व्यक्त केली आहे की, कंपनीच्या आर्थिक कामगिरीत भविष्यात सुधारणा पाहायला मिळू शकते. सध्या पिरामल फार्मा कंपनी ऑरगॅनिक व्यवसाय वाढ करून आपले कर्ज कमी करण्यावर लक्ष देत आहे. कंपनीला शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यावर अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Piramal Pharma Share Price NSE Live 20 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Piramal Pharma Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या