22 November 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News
x

RITES Share Price | राईट्स कंपनी शेअर्स ऑर्डर मिळताच तेजीत, अत्यंत फायद्याचा आहे हा शेअर

RITES Share Price

RITES Share Price | मागील एका वर्षात राईट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. नुकताच या कंपनीला एक नवीन वर्क ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने राईट्स कंपनीला कोट्यवधी रुपयाचे काम दिले आहे. ( राईट्स कंपनी अंश )

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.49 टक्क्यांच्या वाढीसह 644.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के वाढीसह 626.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच राईट्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, त्यांना भारत सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत 67.50 कोटी रुपये मूल्याचे काम देण्यात आले आहे. या ऑर्डर अंतर्गत राईट्स कंपनीला 18 ट्रेडमध्ये गुणवत्ता तपासण्याचे काम देण्यात आले आहे.

राईट्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः वाहतूक सल्लागार आणि अभियांत्रिकी क्षेत्रात व्यवसाय करणारी भारतातील आघाडीची कंपनी मानली जाते. राईट्स कंपनी जगभरातील 55 देशांमध्ये आपल्या सेवा प्रदान करते. राईट्स कंपनीने आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि आखाती देशात विविध कामाची सुरुवात केली आहे.

मागील एका वर्षभरात राईट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 77 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी राईट्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 23 टक्क्यांनी वाढले आहे. राईट्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 825.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 330 रुपये होती. राईट्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15.178.67 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RITES Share Price NSE Live 20 March 2024.

हॅशटॅग्स

#RITES Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x