18 November 2024 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
x

Kopran Share Price | या शेअरची म्युचुअल फंड कंपन्यांकडून मोठी खरेदी, मोठा परतावा मिळण्याचे संकेत

Kopran Share Price

Kopran Share Price | कोप्रान लिमिटेड या स्मॉलकॅप फार्मा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 281.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. ( कोप्रान लिमिटेड कंपनी अंश )

या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, क्वांट स्मॉलकॅप म्युचुअल फंडाने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे कोप्रान लिमिटेड कंपनीमधील 0.5 टक्के भागभांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. आज बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी कोप्रान लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 259.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

क्वांट स्मॉलकॅप म्युचुअल फंडाने कोप्रान लिमिटेड कंपनीचे 250000 शेअर्स खरेदी केल्याची बातमी मिळत आहे. क्वांटने ही गुंतवणूक 255.51 रुपये प्रति शेअर या किमतीवर केली आहे. कोप्रान लिमिटेड ही कंपनी मुख्यतः फॉर्म्युलेशन आणि फार्मा API उत्पादन संबधित व्यवसाय करते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1280 कोटी रुपये आहे.

कोप्रान लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1300 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी कोप्रान लिमिटेड या फार्मा कंपनीचे शेअर्स 18.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 281.15 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील एका वर्षात कोप्रान लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 160 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 20 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 103.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कोप्रान लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 292.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 96 रुपये होती. या कंपनीच्या शेअर्सची सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 375 रुपये होती. 18 एप्रिल 1996 रोजी या कंपनीचे शेअर्स 6 रुपये या आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kopran Share Price NSE Live 20 March 2024.

हॅशटॅग्स

Kopran Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x