26 November 2024 3:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 10 कोटी रुपये परतावा हवा असल्यास किती मासिक SIP करावी लागेल, फायद्याचे बेसिक कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा Free Home Loan | फ्री होम लोनसाठी वापरा 'ही' एक भन्नाट ट्रिक; व्याजाचे सर्व पैसे मिळून मालामाल व्हाल, लक्षपूर्वक वाचा TTML Share Price | TTML शेअर रॉकेट तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर स्टॉक फोकसमध्ये आला - NSE: TTML Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Low Cost Business | कमी पैशांत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; अशी करा सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती Quant Small Cap Fund | मार्ग श्रीमंतीचा, 10,000 रुपयांच्या SIP बचतीवर मिळतील 5 कोटी रुपये, इथे पैसा वाढवा - Marathi News Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना; लाखोंचा परतावा हवा असल्यास, पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची
x

Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.9 टक्के घसरणीसह 371.25 रुपये किमतीवर पोहचले होते. टाटा पॉवर स्टॉक 433.20 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवरून 14.30 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )

आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 7 मार्च 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 2.36 टक्के वाढीसह 388.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, टाटा पॉवर स्टॉकमध्ये 355 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. दैनंदिन चार्टवर टाटा पॉवर स्टॉकमध्ये 410 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. एसव्हीपी रिटेल रिसर्च, रेलिगेअर ब्रोकिंगच्या तज्ञांनी गुंतवणुकदारांना सल्ला दिला आहे की, टाटा पॉवर स्टॉक 365 रुपये किमतीवर खरेदी करावा आणि 410 रुपये या अल्पकालीन टार्गेटसाठी होल्ड करावा. गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकवर 355 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

पुढील 9-12 महिन्यांत टाटा पॉवर स्टॉक 450-500 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, याबाबत अनेक तज्ञांचे मत सकारात्मक आहेत. टाटा पॉवर स्टॉक आपल्या 5-दिवस, 10 दिवस, 20-दिवस आणि 30-दिवसांच्या सिंपल मूव्हिंग एव्हरेज पातळीच्या खाली मात्र 50-दिवस, 100 दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसांच्या SMA किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे.

टाटा पॉवर कंपनीच्या शेअरचा P/E गुणोत्तर 79.62 आहे. तर P/B मूल्य 8.64 आहे. शेअरचा EPS 4.77 वर आहे. डिसेंबर 2023 पर्यंत टाटा सन्सने टाटा पॉवर कंपनीचे 46.86 टक्के भाग भांडवल धारण केले होते. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 15 टक्के मजबूत झाले आहेत.

मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअर्सची किंमत 202 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहोचली आहे. मागील पाच वर्षांत टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 422.95 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,21,374.97 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 21 March 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x