23 November 2024 8:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीकडून नवीन अपडेट येताच शेअर अप्पर सर्किटवर, पुढे किती फायदा?

IREDA Share Price

IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 28 टक्के घसरली होती. मात्र आज हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश )

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 4 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 4.29 टक्के वाढीसह 131.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच NSE ने आयआरईडीए कंपनी संदर्भात एक विधान जारी केले आहे, त्यात त्यांनी म्हंटले आहे की, “आयआरईडीए कंपनीने इक्विटी एक्सचेंज ट्रेडेड फंड्स साठी SEBI पोर्टफोलिओ एकाग्रता नियमांशी संबंधित प्रभाव खर्चाचे उल्लंघन केले असल्याने एनएसई ने आयआरईडीए कंपनीचे शेअर्स विविध निर्देशांकात सामील करण्याचा निर्णय रद्द केला आहे”.

नियतकालिक पुनरावलोकनांवर आधारित भारतीय स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांक देखभाल उपसमितीने 28 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स विविध निर्देशांकांमध्ये सामील करण्याची घोषणा केली होती. एनएसईच्याने आयआरईडीए कंपनीचे शेअर्स निफ्टी 500, निफ्टी मिडकॅप 150, निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी 200, निफ्टी लार्ज मिडकॅप 250, निफ्टी मिडस्मॉल कॅप 400, निफ्टी टोटल मार्केट आणि निफ्टी 50 मल्टी इंडेक्समध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला होता.

28 मार्च 2024 पासून आयआरईडीए कंपनीचे शेअर्स वरील निर्देशांकांमध्ये सामील केले जाणार होते. आता आयआरईडीए स्टॉकच्या जागी व्ही-गार्ड इंडस्ट्रीज स्टॉक निफ्टी 500, निफ्टी स्मॉलकॅप 250 आणि निफ्टी मिडकॅप 400 निर्देशांकांमध्ये सामील केला जाणार आहे.

आयआरईडीए कंपनीचे शेअर्स मागील वर्षी नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. या कंपनीच्या शेअर्सची इश्यू किंमत 32 रुपये होती. तर स्टॉक सूचीबद्ध झाल्यानंतर 214.8 रुपये किमतीवर पोहचला होता. अवघ्या 50 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. आता मात्र आयआरईडीए कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 42 टक्के कमजोर झाला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भंडवल 33,650 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 21 March 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x