21 April 2025 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
x

PCBL Share Price | 31 रुपयाच्या शेअरची कमाल आणि गुंतवणूकदार मालामाल, तब्बल 4253 टक्के परतावा दिला

PCBL Share Price

PCBL Share Price | पीसीबीएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. पीसीबीएल या कार्बन ब्लॅक उत्पादक कंपनीचे शेअर्स मार्च 2020 मध्ये 31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 250 रुपये किमतीच्या पार गेला आहे. या काळात पीसीबीएल कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 684 टक्के परतावा कमावला आहे. ( पीसीबीएल कंपनी अंश )

याकाळात निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक देखील 158 टक्के वाढला होता. पीसीबीएल कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना तब्बल 4253 टक्के नफा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी पीसीबीएल कंपनीचे शेअर्स 2.14 टक्के वाढीसह 250.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2013-2023 या दशकात पीसीबीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7 वर्ष सकारात्मक परतावा दिला आहे. 2017 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना सर्वाधिक म्हणजे 338 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात पीसीबीएल स्टॉक तब्बल 94 टक्के वाढला होता. 2013 साली या कंपनीचे शेअर्स 5.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2013 ते 2023 या काळात पीसीबीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4253 टक्के परतावा कमावून दिला आहे.

पीसीबीएल ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या कार्बन ब्लॅक उत्पादकांत अग्रणी मानली जाते. या कंपनीचा ग्राहक वर्ग 45 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. कार्बन ब्लॅक हा घटक ऑटोमोटिव्ह टायर्सच्या उत्पादनात मुख्य कच्चा माल म्हणून वापरला जातो. याचे उत्पादन तयार करण्यासाठी कार्बन ब्लॅक फीडस्टॉक आणि टार तेल वापरले जाते.

ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलच्या तज्ञानी पीसीबीएल स्टॉकला ‘बाय’ रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 335 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. कार्बन ब्लॅक ऑइल आणि कार्बन ब्लॅक फीडस्टॉक यांच्यातील फरक भारतीय उद्योगांसाठी सकारात्मक आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, पीसीबीएल सारख्या भारतीय कंपन्या CBFS क्षेत्रात चीनच्या CBO कार्बन ब्लॅक उत्पादकांवर स्पर्धात्मक दबाव निर्माण करण्याची अपेक्षा आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PCBL Share Price NSE Live 21 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PCBL Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या