24 November 2024 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरला चार्टवर या प्राईसवर सपोर्ट, ब्रेकआउट बाबत तज्ज्ञांनी काय म्हटले?

Jio Financial Services Share Price

Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल या मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 335.65 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. ( जिओ फायनान्शियल कंपनी अंश )

जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 374.50 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 10.37 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मागील आठवड्यात 12 मार्च रोजी या कंपनीचे शेअर्स 374 रुपये किमतीवर पोहचले होते. आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी जिओ फायनान्शियल स्टॉक 1.09 टक्के वाढीसह 342.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

नुकताच जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या Jio Leasing Services Limited उपकंपनीमध्ये 40 कोटी रुपयेची गुंतवणूक केली आहे. ही कंपनी जंगम मालमत्ता प्रोजेक्ट भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. मंगळवारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने सेबीला कळवले की, त्यांनी आपल्या व्यावसायिक हेतूंसाठी JLSL कंपनीचे प्रत्येकी 10 रुपये किंमतीचे चार कोटी शेअर्स 40 कोटी रुपयेला खरेदी केले आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल स्टॉकमध्ये 325 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर 360 रुपये किमतीवर ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या मते, जिओ फायनान्शियल स्टॉक 355 रुपये किमतीवर जाऊ शकतो. म्हणून तज्ञांनी हा स्टॉक 325 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक करताना तोटा टाळण्यासाठी तज्ञांनी 310 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

टिप्स ट्रेड्स फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल स्टॉक दैनिक चार्टवर मंदीचे संकेत देत आहे. पुढील काळात हा स्टॉक 305 रुपये किमतीवर येण्याची शक्यता आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक-ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल स्टॉकमध्ये 330 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर ब्रेकआउट पातळी 360 रुपये किमतीवर आहे. जर हा स्टॉक 360 रुपये किमतीच्या पार गेला तर, शेअर अल्पवधीत 375 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Services Share Price NSE Live 22 March 2024.

हॅशटॅग्स

#Jio Financial Services Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x