23 November 2024 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

IRFC Vs RVNL Share Price | रेल्वे सेवा शेअर्समध्ये जोरदार तेजी, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, पुन्हा मल्टीबॅगर कमाई?

IRFC Vs RVNL Share Price

IRFC Vs RVNL Share Price | रेल विकास निगम म्हणजेच आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 249.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. ( रेल विकास निगम कंपनी अंश )

नुकताच आरव्हीएनएल कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 339 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 239.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.35 टक्के वाढीसह 247.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने नवीन ऑर्डरसाठी LOA जारी केले आहे. ही ऑर्डर पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉरवर PCMC आणि NIGDI मधील एलिव्हेटेड व्हायाडक्टच्या डिझाइन आणि बांधकामाशी संबंधित 339.23 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. या कामाची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 130 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. मागील आठवड्यात आरव्हीएनएल कंपनीला मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 386 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते.

मागील एका वर्षभरात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 285 टक्के परतावा कमावून दिला आहे. 21 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 64.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 21 मार्च 2024 रोजी हा स्टॉक 249.45 रुपये किमतीवर पोहोचला होता. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 55 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 63.70 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs RVNL Share Price NSE Live 22 March 2024.

हॅशटॅग्स

IRFC Vs RVNL Share price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x