23 November 2024 12:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Sarveshwar Foods Share Price | 34 पैशाचा शेअर श्रीमंत करणार, अल्पावधीत 2644% परतावा दिला, 2 दिवसात 10% वाढला

Sarveshwar Foods Share Price

Sarveshwar Foods Share Price | सर्वेश्वर फूड्स या स्मॉलकॅप एफएमसीजी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 9.33 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी सर्वेश्वर फूड्स स्टॉक 4.84 टक्के वाढीसह 9.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( सर्वेश्वर फूड्स कंपनी अंश )

मागील चार वर्षात सर्वेश्वर फूड्स स्टॉक 0.34 पैसेवरून वाढून 9.33 रुपये किमतीवर पोहचला आहे. अवघ्या चार वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2644 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही चार वर्षापूर्वी सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.5 लाख रुपये झाले असते.

मागील एका वर्षात सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 253 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 55 टक्के मजबूत झाली आहे. डिसेंबर 2023 पासून या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. मात्र मार्च 2024 पर्यंत या महिन्याच्या सुरुवातीच्या काही आठवड्यात सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 37 टक्क्यांनी घसरले होते.

डिसेंबर ते फेब्रुवारी 2024 दरम्यान सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 191 टक्क्यांनी मजबूत झाले होते. यावर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये सर्वेश्वर फूड्स स्टॉक 85 टक्के आणि जानेवारी 2024 मध्ये हा स्टॉक 33 टक्क्यांनी मजबूत झाला होता. सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 15.73 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 40 टक्के कमजोर झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 2.07 रुपये होती.

सर्वेश्वर फूड्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः भारतात बासमती आणि गैर-बासमती तांदूळ उत्पादन आणि विक्रीचा व्यवसाय करते. ही कंपनी बासमती ब्राऊन राइस, कच्चा तांदूळ, परबोइल केलेला तांदूळ, रेशमी कच्चा तांदूळ, पांढरा परबोइल केलेला तांदूळ आणि गोल्डन परबोइल केलेला तांदूळ विकण्याचा व्यवसाय करते.

सर्वेश्वर फूड्स कंपनीने. निम्बार्क या ब्रँड नावाखाली विविध सेंद्रिय पदार्थ देखील लाँच केले आहेत. ही कंपनी पूर्वी सर्वेश्वर ऑरगॅनिक फूड्स लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. मात्र जून 2015 मध्ये कंपनीने आपले नाव बदलून सर्वेश्वर फूड्स लिमिटेड असे केले होते. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीची स्थापना 1890 साली जम्मू काश्मीर येथे झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sarveshwar Foods Share Price NSE Live 22 March 2024.

हॅशटॅग्स

Sarveshwar Foods Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x