22 November 2024 2:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

GMP IPO | हा स्वस्त IPO शेअर धुमाकूळ घालणार, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP ने दिले संकेत

GMP IPO

GMP IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच क्रिएटिव्ह ग्राफिक्स सोल्युशन्स इंडिया लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ( क्रिएटिव्ह ग्राफिक्स सोल्युशन्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश )

पॅकेजिंग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या या कंपनीचा IPO 28 मार्च रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीच्या आयपीओचा आकार 54.4 कोटी रुपये आहे. क्रिएटिव्ह ग्राफिक्स सोल्युशन्स इंडिया लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 80-85 रुपये निश्चित केली आहे.

क्रिएटिव्ह ग्राफिक्स सोल्युशन्स इंडिया लिमिटेड कंपनीचे IPO शेअर्स NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील. IPO मधून जमा होणारी रक्कम कंपनी आपल्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी, अधिग्रहण आणि सामान्य कॉर्पोरेट गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करणार आहे. क्रिएटिव्ह ग्राफिक्स सोल्युशन्स इंडिया कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1600 शेअर्स ठेवले आहेत. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांना 136000 रुपये जमा करावे लागतील.

सध्या क्रिएटिव्ह ग्राफिक्स सोल्युशन्स इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 92.10 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. IPO नंतर हे प्रमाण 67.83 टक्केवर येईल. या कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 40 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. यावरून असे कळते की, कंपनीचे शेअर्स 120 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 47 टक्के नफा सहज मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GMP IPO of Creative Graphics Solutions India IPO 26 March 2024.

हॅशटॅग्स

#GMP IPO(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x