22 November 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार?

Lloyds Enterprises Share Price

Lloyds Enterprises Share Price | लॉयड्स एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मार्च 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 1.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 28 रुपये किमतीवर पोहचला आहे. अवघ्या चार वर्षात लॉयड्स एंटरप्रायझेस कंपनीच्या गुंतवणूकदारांनी संयम राखून 2337 टक्के नफा कमावला आहे. ( लॉयड्स एंटरप्रायझेस कंपनी अंश )

जर तुम्ही मार्च 2020 मध्ये या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 24 लाख रुपये झाले असते. आज गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी लॉयड्स एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 27.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका वर्षात लॉयड्स एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 333 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 टक्के कमजोर झाली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के घसरले होते. तर जानेवारी 2024 मध्ये हा स्टॉक 3 टक्क्यांपेक्षा किंचित जास्त वाढला होता. मात्र मार्च 2024 मध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 24 टक्क्यांनी कमजोर झाली आहे.

लॉयड्स एंटरप्रायझेस ही कंपनी मुख्यतः भारतात लोखंड आणि पोलाद उत्पादनांचा व्यवसाय करते. ही कंपनी. हायड्रोकार्बन, तेल आणि वायू क्षेत्र तसेच स्टील प्लांट, पॉवर प्लांट, न्यूक्लियर प्लांट बॉयलर, टर्नकी प्रकल्प इत्यादींसाठी जड उपकरणे, यंत्रसामग्री आणि प्रणालींचे डिझाइन आणि उत्पादन संबधित व्यवसाय करण्यात अग्रेसर मानली जाते. ही कंपनी पूर्वी श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. सप्टेंबर 2023 मध्ये कंपनीने आपले नाव बदलून लॉयड्स एंटरप्राइजेस लिमिटेड असे केले. लॉयड्स एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीची स्थापना 1986 साली मुंबईमध्ये झाली होती.

लॉयड्स एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स सध्या 28 रुपये किमतीजवळ ट्रेड करत आहेत. 17 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 47.75 रुपये विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत 40 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. 29 मार्च 2023 रोजी लॉयड्स एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 6.12 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या तुलनेत शेअर 371 टक्क्यांहून वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lloyds Enterprises Share Price BSE Live 28 March 2024.

हॅशटॅग्स

Lloyds Enterprises Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x