22 November 2024 8:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये महत्वाचा बदल, ग्राहक खुश, मालामाल करणाऱ्या गुंतवणुकीकडे मोर्चा वळवला

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. 27 मार्च 2024 रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने निधी सक्सेना यांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून नियुक्त करण्याची अधिसूचना जारी केली होती. ( बँक ऑफ महाराष्ट्र अंश )

निधी सक्सेना बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पुढील तीन वर्षांसाठी काम करतील. सध्या निधी सक्सेना युनियन बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक म्हणून काम करत आहेत. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 62.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

निधी सक्सेना बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ए.एस. राजीव यांची जागा घेणार आहेत. ए एस राजीव यांना केंद्रीय दक्षता आयोगामध्ये दक्षता आयुक्त पदावर बढती देण्यात आली आहे. ही बातमी येताच आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स 5.24 टक्के वाढीसह 63.08 रुपये किमतीवर पोहचले होते.

बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर मालामाल करणार
तज्ञांच्या मते, या बँकेचे शेअर्स अल्पावधीत 68 रुपये ते 70 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी हा स्टॉक खरेदी करताना 58 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावला पाहिजे. या स्टॉकमध्ये नुकताच एक महत्त्वपूर्ण ब्रेकआउट पाहायला मिळाला आहे. यासोबतच शेअर्सच्या ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये देखील कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 58 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. त्यामुळे तज्ञांनी टार्गेट प्राइस 68 रुपये ते 70 रुपये निश्चित केली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्सवर कालावधीनुसार गुंतवणूकदारांना झालेला फायदा
1. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी 5 वर्ष – फायदा मिळाला 349.45%
2. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी 1 वर्ष – फायदा मिळाला 167.53%
3. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी 6 महिने – फायदा मिळाला 31.49%
4. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्स – कालावधी YTD आधारावर – फायदा मिळाला 35.38%

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bank of Maharashtra Share Price NSE Live 30 March 2024.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x