23 November 2024 2:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Yes Bank Share Price | शेअर प्राईस रु. 23, आता येस बँकेबाबत चिंता वाढवणारी बातमी आली, शेअरवर काय परिणाम होणार?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. नुकताच आयकर विभागाने येस बँकेला 112.81 कोटी रुपयेची टॅक्स डिमांड नोटीस धाडली आहे. येस बँकेला 27 मार्च 2024 रोजी आयकर विभागाच्या नॅशनल फेसलेस असेसमेंट यूनिटने रिअसेसमेंट ऑर्डर जारी केली होती. ( येस बँके अंश )

या नोटीसमध्ये आयकर विभागाने येस बँकेकडून 112.81 कोटी रुपये टॅक्सची अतिरिक्त मागणी केली आहे. गुरूवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.22 टक्के वाढीसह 23.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

येस बँकेने आपल्या स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कळवले आहे की, “येस बँकेला विश्वास आहे की या प्रकरणात बँक आपली भूमिका योग्यरित्या सिद्ध करण्यासाठी पुरेसे तथ्यात्मक आणि कायदेशीर आधार मांडण्यास सक्षम आहे. यासह बँकेने स्पष्ट केले आहे की, आयकर विभागाच्या नोटीसचा बँकेच्या आर्थिक, परिचालन किंवा इतर क्रियाकलापांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. येस बँक आयकर विभागाच्या विरोधात त्यांना जारी केलेल्या आदेशाविरुद्ध कायदेशीर अपील करणार आहे”.

येस बँक स्टॉक गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.22 टक्क्यांच्या वाढीसह 23.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका वर्षात येस बँक स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 55.08 टक्के परतावा कमावून दिला आहे.

येस बँक शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.81 रुपये होती. डिसेंबर 2023 तिमाहीत येस बँकेने 231 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने 51.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 30 March 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(195)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x