27 November 2024 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार मल्टिबॅगर NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC Post Office Scheme | 0% जोखीम आणि 100% सुरक्षित परतावा; 'या' योजनेत तुम्ही पैसे गुंतवले का, फायद्याची बातमी - Marathi News Sarkari Naukri | सरकारी कंपनीमध्ये नोकरीची संधी; पगार 55000, अर्ज प्रक्रिया आणि इतर डिटेल्स जाणून घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा JP Power Share Price | 17 रुपयाचा शेअर रॉकेट तेजीचे, खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 1450% परतावा - NSE: JPPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉकमध्ये मजबूत तेजी, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस अपग्रेड, पुढे किती कमाई होणार?

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म ॲक्सिस सिक्युरिटीजने टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सवर 177 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,94,616.87 कोटी रुपये आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सचा PE 43.67 आणि EPS (TTM) 3.73 आहे. आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 2.53 टक्के वाढीसह 159.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टाटा स्टील कंपनी अंश )

टाटा स्टील कंपनी भारतातील दिग्गज स्टील उत्पादक कंपनी आहे. या कंपनीमध्ये एलआयसीने देखील गुंतवणूक केली आहे. एलआयसी कंपनीने टाटा स्टील कंपनीचे 7.29 टक्के भाग भांडवल म्हणजेच एकूण 90,97,67,778 शेअर्स धारण केले आहेत. मागील 1 वर्षात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 52 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे.

टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 159.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 101.65 रुपये होती. मागील 1 महिन्यात टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 16 टक्के वाढली आहे. तर मागील 3 वर्षात टाटा स्टील स्टॉक तब्बल 103 टक्के वाढला आहे. मागील 5 वर्षात टाटा स्टील कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तब्बल 208 टक्के वाढवले आहे. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत टाटा स्टील कंपनीमधील म्युच्युअल फंड होल्डिंग 9.44 टक्केवरून वाढून 9.83 टक्केवर गेली आहे.

टाटा स्टील कंपनीने 24 मे 2001 पासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल 29 वेळा लाभांश वाटप केला आहे. मागील 12 महिन्यांत, टाटा स्टील कंपनीने प्रति शेअर 3.60 रुपये इक्विटी लाभांश वाटप केला आहे. टाटा स्टील कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 2.31 टक्के आहे. टाटा स्टील कंपनीने 2022 मध्ये 51 रुपयेचा सर्वाधिक लाभांश वाटप केला होता. टाटा स्टील कंपनीने आपले शेअर्स देखील 1:10 या प्रमाणात विभाजित केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE Live 01 April 2024.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(118)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x