22 November 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय. कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला, वेळीच फायदा घ्या

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल स्टॉक 2 टक्क्यांच्या वाढीसह 253.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )

सध्या या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 4000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 1.78 टक्के वाढीसह 251.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बीएचईएल कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, नवीन ऑर्डर अंतर्गत कंपनीला बॉयलर, टर्बाइन आणि जनरेटरचा पुरवठा करायचा आहे. याशिवाय रायगडमध्ये 2×800 मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प उभारणी आणि पर्यवेक्षणाचे काम देखील करायचे आहे. बीएचईएल कंपनी टर्बाइनचे उत्पादन त्रिची आणि हरिद्वार प्लांटमध्ये करणार आहे. या ऑर्डरची पूर्तता पुढील 31 महिन्यांत केली जाणार असल्याची माहिती बीएचईएल कंपनीने दिली आहे.

मागील महिन्यात बीएचईएल कंपनीला सिगरौली सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट उभारणी संबंधित तिसऱ्या टप्प्याचे काम मिळाले होते. या प्लांटची क्षमता 1600 मेगावॅट आहे. मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 247.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 6 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 95.3 टक्के वाढले असते.

बीएचईएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 271.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 67.63 रुपये होती. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 86,076.61 कोटी रुपये आहे. भारत सरकारने बीएचईएल कंपनीचे एकूण 63.20 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर एलआयसी कंपनीने बीएचईएल कंपनीचे 9 टक्क्यांपेक्षा जास्त भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 01 April 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x