23 November 2024 5:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 13 रुपये, व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पुढची टार्गेट प्राइस?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7.55 टक्क्यांच्या वाढीसह 14.24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 6 रुपयेवरून वाढून 14.24 रुपये किमतीवर पोहचली होती. आज मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.50 टक्के घसरणीसह 13.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सध्या व्होडाफोन आयडिया कंपनी भांडवल उभारणी करणार असल्याची बातमी मिळत आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या संचालक मंडळाने ATC टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 1,440 कोटी रुपये मूल्याचे इक्विटी शेअर्स जारी केले आहेत. यामुळे व्होडाफोन आयडिया कंपनीमधील एटीसी कंपनीची हिस्सेदारी वाढून 2.9 टक्केवर गेली आहे. यापूर्वी व्होडाफोन आयडिया कंपनीने इक्विटी शेअर्स आणि कर्ज उभारणीच्या माध्यमातून 45,000 कोटी रुपये भांडवल उभारण्याची घोषणा केली होती. यासह कंपनीने 20,000 कोटी रुपये इक्विटी निधी उभारण्याची देखील घोषणा केली होती.

व्होडाफोन आयडिया कंपनीने आज म्हणजेच 2 एप्रिल 2024 रोजी कंपनीच्या शेअरधारकांची बैठक आयोजित केली आहे. शेअरधारकांच्या मान्यतेच्या अधीन राहून पुढील तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनी इक्विटी फंड उभारणी करेल. यामध्ये कंपनीचे प्रवर्तकही भाग घेणार आहेत. व्होडाफोन आयडिया कंपनी 4G कव्हरेज, 5G नेटवर्क रोलआउट आणि इक्विटी आणि कर्जाच्या माध्यमातून भांडवल उभारणी करून व्यवसाय विस्तार करणार आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनी निधी उभारल्यानंतर पुढील 6 ते 7 महिन्यांत 5G सेवा लाँच करेल. सध्या व्होडाफोन आयडिया स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. मात्र हा स्टॉक आपल्या 30 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवसांच्या SMA च्या खाली ट्रेड करत आहे.

प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञाच्या मते, व्होडाफोन आयडिया स्टॉक 16.40 रुपये ते 18.40 रुपये किमतीवर जाऊ शकतो. या स्टॉकमध्ये 11.90 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2023 पर्यंत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 50.36 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 02 April 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x