23 November 2024 12:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा
x

Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर शेअर्स अप्पर सर्किटवर, सरकारच्या नवीन योजनेमुळे स्टॉक पुन्हा तेजीत

Servotech Share Price

Servotech Share Price | सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 81.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 108.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनी अंश )

29 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.48 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 85.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 112 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

भारतात इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरला गती देण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने 500 कोटी रुपयांची इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट प्रमोशन स्कीम 2024 सुरू केली आहे. या EMPS 2024 स्कीम अंतर्गत लोकांना इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्यासाठी 10,000 रुपये मदत केली जाईल. यासह भारत सरकार लहान तीन-चाकी ई-रिक्षाची खरेदी करण्यासाठी 25,000 रुपये मदत करणार आहे. मोठ्या थ्री-व्हीलरच्या बाबतीत भारत सरकार 50,000 रुपये आर्थिक मदत करणार आहे.

EMPS 2024 स्कीमची मुदत 31 जुलै 2024 पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. या स्कीममध्ये, इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचा वापर वाढण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या स्कीमसाठी सरकारने 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या चार महिन्यांसाठी 500 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या स्कीम अंतर्गत 3,72,215 इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या योजनेमुळे देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Servotech Share Price NSE Live 02 April 2024.

हॅशटॅग्स

Servotech Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x