23 November 2024 4:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्समध्ये मजबूत वाढ होतेय, स्टॉक तेजीचं नेमकं कारण काय?

Adani Gas Share Price

Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 1 एप्रिल रोजी 8 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. अदानी टोटल गॅस कंपनीने उत्तर प्रदेश राज्यात मथुरा जिल्ह्यात बरसाना बायोगॅस प्लांटमध्ये व्यावसायिक गॅस उत्पादन सुरू केल्याची घोषणा केली आहे, त्यामुळे शेअर्स एका दिवसात 8 टक्के वाढले होते. आज मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी अदानी टोटल गॅस स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 973.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( अदानी टोटल गॅस कंपनी अंश )

अदानी टोटल गॅस कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, बरसाना बायोगॅस प्रकल्पामध्ये 3 टप्पे आहेत आणि त्याची उत्पादन क्षमता लक्ष्य दिवसाला 600 टन फीडस्टॉक पर्यंत साध्य करायची आहे. अदानी टोटल गॅस स्टॉक सोमवारी 947 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यांनतर हा स्टॉक 8 टक्के वाढीसह 1,000 रुपये या आपल्या इंट्राडे उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. अदानी टोटल गॅस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीचे शेअर्स 521.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 80 टक्के वाढले आहेत.

अदानी टोटल गॅस कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, जेव्हा हा प्लांट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, तेव्हा प्लांट दररोज 42 टन कॉम्प्रेस्ड बायो गॅस आणि 217 टन सेंद्रिय खत उत्पादन करेल. या प्लांटचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर हा प्लांट भारतातील सर्वात मोठा कृषी कचऱ्यावर चालणारा बायो-सीएनजी प्लांट बनेल.

बरसाना बायोगॅस प्रकल्पाच्या तीन टप्प्यांचे काम पूर्ण करण्यासाठी 200 कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे. दरम्यान, एलएनजी विभागामध्ये अदानी टोटल गॅस कंपनी गुजरात राज्यात दहेज याठिकाणी त्यांचे पहिले एलएनजी रिटेल आउटलेट उघडण्याची तयारी करत आहे. अदानी टोटल गॅस कंपनी संपूर्ण भारतात आपले एलएनजी स्टेशन नेटवर्क स्थापन करणार आहे. हे आउटलेट जुलै 2024 पर्यंत कार्यान्वित केले जातील.

व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवलात म्हंटले आहे की, इलेक्ट्रिक व्हेईकल विभागात व्यवसाय विस्तार करण्यासाठी अदानी टोटल गॅस कंपनीने 1050 पेक्षा जास्त ईव्ही चार्जिंग पॉइंट्सचे बांधकाम सुरू केले आहे. भारतात विविध शहरांमध्ये हे काम पूर्ण करण्यासाठी अनेक भागधारकांसोबत करार करण्यात आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Gas Share Price NSE Live 02 April 2024.

हॅशटॅग्स

Adani Gas Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x