18 October 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BMC Recruitment 2024 | मुंबई महानगरपालिकेत 690 रिक्त जागांसाठी भरती, पगार 1,42,000 रुपये, असा करा अर्ज - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका - NSE: RVNL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरने यावर्षी 41% परतावा दिला, तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN GTL Share Price | GTL पेनी शेअर 45 रुपयांची पातळी स्पर्श करणार, कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला - BSE: 513337 Horoscope Today | या राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार, प्रमोशन वाढीचा देखील आहे योग, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य Festive Season Fashion | सणासुदीच्या काळात हवा आहे परफेक्ट लूक, तर या 4 साड्यांचे कलेक्शन तुमच्याजवळ असलेच पाहिजे Viral Video | गिटार वाजवून अन् गाणं गाऊन विकली भाजी, विक्रेत्याची अनोखी शक्कल, VIDEO व्हायरल - Marathi News
x

Jyothy Labs Share Price | ज्योती लॅब शेअर्स चार्टवर मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर

Jyothy Labs Share Price

Jyothy Labs Share Price | ज्योती लॅब्स या हाऊस होल्ड प्रॉडक्ट इंडस्ट्रीजमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. या स्टॉकने आपल्या दैनिक चार्टवर 200 DMA वर सपोर्ट निर्माण केला आहे. ज्योती लॅब्स कंपनीचे शेअर्स आपल्या सर्व महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलपेक्षा वरच्या पातळीवर ट्रेड करत आहेत. ( ज्योती लॅब्स कंपनी अंश )

टेक्निकल आघाडीवर या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. तज्ञांनी पुढील तीन महिन्यांसाठी हा स्टॉक 500 रुपये टार्गेटसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी ज्योती लॅब स्टॉक 1.05 टक्के घसरणीसह 443.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

24 जानेवारी 2024 रोजी ज्योती लॅब कंपनीचे शेअर्स 553 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 28 मार्च 2024 रोजी हा स्टॉक 439 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. फिनलर्न अकादमीच्या तज्ञांच्या मते, ज्योती लॅब शेअरची ट्रेडिंग रेंज 448 ते 453 रुपये आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना 425 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक अल्पावधीत 520 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

मागील काही महिन्यात ज्योती लॅब कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. आता हा स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. ज्योती लॅब कंपनीचे शेअर्स दैनंदिन चार्टवर मजबूत वाढीचे संकेत देत आहे. या कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस आणि 200 दिवसाच्या DMA पातळीवर ट्रेड करत आहेत. हा स्टॉक 50 दिवसाच्या DMA पातळीच्या खाली ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jyothy Labs Share Price NSE Live 03 April 2024.

हॅशटॅग्स

Jyothy Labs Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x