24 November 2024 12:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

OnePlus Nord CE4 5G | वनप्लसच्या नव्या 5G स्मार्टफोनचा सेल सुरु, 25000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट डील

OnePlus Nord CE4 5G

OnePlus Nord CE4 5G | चीनचा टेक ब्रँड वनप्लसने नुकताच नॉर्ड लाइनअपचा लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus Nord CE4 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, स्टोअर्स आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर आज दुपारी 12 वाजल्यापासून या डिव्हाइसची विक्री सुरू होणार आहे. या फोनमध्ये दमदार कॅमेरा, अँड्रॉइड 14 आणि 100 वॉट फास्ट चार्जिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

कंपनीने आपल्या परवडणाऱ्या स्मार्टफोनमध्ये 5500 एमएएच क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा फोन लाँच केला असून 100 वॉट फास्ट चार्जिंगमुळे केवळ 15 मिनिटांच्या चार्जिंगमुळे फोनएका दिवसाची बॅटरी लाइफ देतो. या डिव्हाइसमध्ये व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे याची रॅम क्षमता 16 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. दमदार परफॉर्मन्ससाठी यात क्वॉलकॉम प्रोसेसर देण्यात आला आहे.

OnePlus Nord CE4 5G किंमत
वनप्लसच्या नव्या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटला 24,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज च्या व्हेरियंटची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन डार्क क्रोम आणि सेलाडॉन मार्बल या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

OnePlus Nord CE4 5G स्पेसिफिकेशन्स
वनप्लसच्या नव्या फोनमध्ये 6.7 इंचाचा अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसोबत येतो. दमदार परफॉर्मन्ससाठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे. फोनमध्ये अँड्रॉइड 14 वर आधारित ऑक्सिजनओएस 14 सॉफ्टवेअर आहे.

कॅमेरा सेटअप
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनेलवर ड्युअल कॅमेरा आहे, ज्यामध्ये 50 एमपी प्रायमरी सेन्सरसह 8 एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5500 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 100 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देते.

News Title : OnePlus Nord CE4 5G Price in India 04 April 2024.

हॅशटॅग्स

#OnePlus Nord CE4 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x