24 November 2024 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

GTL Share Price | स्वस्त शेअर अप्पर सर्किट हिट करतोय, अल्पावधीत मोठा परतावा, कंपनीकडून मोठी अपडेट आली

GTL Share Price

GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. 11 मार्च 2024 रोजी गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 62.97 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )

एप्रिल 2023 मध्ये गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 8.92 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी गुजरात टूलरूम स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 49.21 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. गुजरात टूलरूम कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना शेअर्सच्या दर्शनी मूल्यावर 100 टक्के ते 165 टक्के लाभांश वाटप करण्याचा विचार करत आहे.

या कंपनीचे शेअर्स सध्या 50 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहेत. गुजरात टूलरूम कंपनीने 8 एप्रिल 2024 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 0.37 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 99.63 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

नुकताच गुजरात टूलरूम कंपनीने भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत करार केला आहे. गुजरात टूलरूम कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीजने 29 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत गुजरात टूलरूम कंपनीला बांधकाम साहित्याचा पुरवठा करण्याचे काम मिळाले आहे. या कंपनीला भविष्यात देखील मोठ्या ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Share Price NSE Live 04 April 2024.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x