18 November 2024 8:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Gold Rate Today | लग्नसराई पूर्वीच सोनं खरेदीसाठी अधिक पैसा खर्च करावा लागणार, आज भाव विक्रमी स्तरावर पोहोचला

Gold Rate Today

Gold Rate Today | जागतिक बाजारात सोन्याचे दर दररोज नवा विक्रम करत आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरही सोने-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याचे दर वाढल्याने दागिने खरेदी करणाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचा भाव 0.04 टक्क्यांनी वधारून 69825 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याशिवाय चांदीचा भावही 0.68 टक्क्यांनी वाढून 79550 रुपये प्रति किलो झाला आहे.

राष्ट्रीय स्तर असो वा आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज बाजार उघडताना सोन्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आज 14 ते 24 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव
मुंबई-पुणे सह देशातील प्रमुख शहरांमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,936 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर काल बाजार बंद होईपर्यंत तो 69,364 रुपयांवर व्यवहार करत होता. दरम्यान, 99.5 टक्के शुद्धतेचे 24 कॅरेट सोने 69,656 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

22 कॅरेट सोन्याचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 64,061 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. काल त्याचा बंद भाव 63,537 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

18 कॅरेट सोन्याचा भाव
18 कॅरेट 10 ग्रॅमबद्दल बोलायचे झाले तर ते 52,452 च्या पातळीवर ट्रेड करत आहे. तर काल बाजार बंद झाला तेव्हा तो 52,023 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

14 कॅरेट सोन्याचा भाव
आज 14 कॅरेट सोन्याचा भाव 40,913 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर काल बाजार बंद झाला तेव्हा तो 40,578 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

जाणून घ्या काय आहे चांदीची स्थिती
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या दरात ही तेजी पाहायला मिळत आहे. आज बाजारात 79,063 रुपये प्रति 10 ग्रॅम चा भाव आहे. तर काल बाजार बंद होईपर्यंत तो 77,594 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 04 April 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x