18 November 2024 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
x

Reliance Power Share Price | 32 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार? यापूर्वी 2858% परतावा दिला, स्टॉक चार्ट काय सांगतोय?

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | मागील काही दिवसापासून रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 33.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 मार्च 2024 पासून आतपर्यंत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 64 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

मागील 4 वर्षांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2800 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 10.30 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 2.25 टक्के घसरणीसह 32.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 4 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 33.43 रुपये किमतीवर पोहोचले होते. याकाळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2858 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 29.58 लाख रुपये झाले असते.

मागील एका वर्षभरात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 210 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 4 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 33.43 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 6 महिन्यांत रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 79 टक्क्यांनी वाढवले आहे.

अवघ्या 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 18.76 रुपयेवरून वाढून 33 रुपये किमतीवर गेले आहेत. मागील एका महिन्यात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीने आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि डीबीएस बँकेची कर्ज थकबाकी परतफेड केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 05 April 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x