24 November 2024 10:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या
x

मी महापालिका आयुक्तांना भेटतो; तोपर्यंत कोणीही आले तरी तिथून हलू नका: राज ठाकरे

 MNS, Raj Thackeray, Raj Thakre, Koli Samaj, Koli Peoples, Mumbai Municipal Corporation

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत कित्येक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईतील कोळी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील समजला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून याच कोळी समाजात शिवसेनेविरुद्धची धुसफूस दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मुंबई शहरातील कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे अनेक कोळीवाड्यांचे अस्तीत्वच धोक्यात आलेले असताना, या प्रकल्पाने कोळी समाजातील वस्त्या सर्वाधिक बाधित होणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक वस्त्यांमध्ये कोस्टल रोडला मोठा विरोध होतो आहे. विशेष म्हणजे शिवसेना स्वतः याविषयात आग्रही असल्याने तसेच राज्यात देखील सत्तेत असून आता कोळि समाजाच्या मुळावर येणाऱ्या गोष्टी करत असल्याने सध्या हा समाज शिवसेनेवर अत्यंत नाराज असल्याचं समजतं.

मात्र त्यात अजून एक भर पडली आहे, कारण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटच्या मासे विक्रेत्यांना ऐरोली नाक्यावर स्थलांतराची नोटीस मुंबई महानगरपालिकेने बजावली आहे. एक ऑगस्ट पासून हे छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट या परिसरातून हलवून ते ऐरोली या परिसरात स्थलांतरित करण्याची नोटीस महापालिकेने इथल्या मासे व्यापाऱ्यांना दिलेली आहे. वास्तविक त्यांची सोय मुंबईमध्ये करणे अपेक्षित असताना थेट कोळी समाजातील मासे विक्रेत्यांना थेट मुंबईबाहेर फेकण्याचा बहाणा सत्ताधाऱ्यांना मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

क्रॉफर्ड मार्केट येथे मागील ४० वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट वसलेले आहे. येथे दररोज मोठ्याप्रमाणावर मासे विक्री होतो आणि त्यावर तब्बल १० लाख लोकं अवलंबून आहेत असं इथल्या कोळी बांधवानी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. दररोज लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या कोळी बांधवांना थेट ऐरोलीला जाण्याच्या हालचाली झाल्याने सर्व कोळी समाज संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

महात्मा फुले मार्केट समोरील छत्रपती शिवाजी महाराज मच्छी मार्केटमधील कोळी बांधवांनी आज, गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. येथील मच्छी मार्केट ऐरोली या ठिकाणी हलवण्यात येणार असून याला विरोध करतानाच कोळी महिलांनी राज ठाकरे यांच्याकडे त्यांची कैफियत मांडली. यावेळी राज ठाकरे यांनी कोळी बांधवांना दिलासा देत मी तुमच्या पाठीशी आहे, असे सांगितले. तसेच मी स्वतः मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून तुमचा विषय मांडणार आहे. तोपर्यंत कोणीही आले तरी तुम्ही तिथून हलू नका, असे राज ठाकरेंनी कोळी बांधवांना सांगितले.

महात्मा फुले मार्केट समोरील छत्रपती शिवाजी महाराज मच्छी मार्केटमधील कोळी महिलांना महापालिकेच्या वतीने जागा खाली करण्याची नोटिस देण्यात आली आहे. तसेच त्यांचे कायम स्वरूपी ऐरोली येथे स्थलांतरीत केले आहे. त्या विरोधात तेथील कोळी महिला, माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्या शिष्टमंडळ आज कृष्णकुंजवर जाऊन राज साहेब ठाकरे यांची भेट घेतली.

क्रॉफर्ड मार्केट समोरील घाऊक मासळी बाजार असलेल्या शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक ठरल्याने येथील बाजार आता मानखुर्द-ऐरोली या जकात नाक्याच्या जागेवर हलवला जाणार आहे. महापालिकेच्या या निर्णयाचा तीव्र विरोध आता मच्छिमारी संस्थांकडून होऊ लागला आहे. महापालिकेने १ ऑगस्टपर्यंत सकारात्मक कार्यवाही करून पुनर्वसनाचा निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने दिला आहे. कॉफ्रर्ड मार्केट समोरील घाऊक मासळी बाजार भरल्या जाणार्‍या शिवाजी महाराज मंडईची वास्तू धोकादायक बनल्याने या मंडईतील सर्व मासे विक्रेत्यांचे मानखुर्द-ऐरोली येथील जकात नाक्याच्या जागेवर पुनर्वसन करण्याचा निर्णय महापालिका बाजार विभागाने घेतला आहे. यासंदर्भात मासे विक्रेत्यांना जागा खाली करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x