22 November 2024 5:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 13 रुपये! कंपनीबाबत महत्वाची अपडेट आली, शेअरला फायदा होणार?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शनिवारी कंपनीने माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाने, आदित्य बिर्ला समूहाकडून 2,075 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

यासोबतच कंपनीने आपले अधिकृत भागभांडवल 1 लाख कोटी रुपयेपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव देखील मंजूर केला आहे. 8 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत या सर्व प्रस्तावांवर शेअरधारकांची मंजुरी घेतली जाईल. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.38 टक्के वाढीसह 13.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्होडाफोन आयडिया कंपनीच्या संचालक मंडळाने 139.54 कोटी इक्विटी शेअर्स 14.87 रुपये किमतीवर इश्यू करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये कंपनीने 4.87 रुपये प्रति इक्विटी शेअर प्रीमियम देखील जोडला आहे. कंपनी या भांडवलाचा वापर आपल्या कामकाजी वित्तपुरवठा आणि कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी खर्च करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने जून 2024 पर्यंत प्रवर्तक आणि इतर गुंतवणूकदारांकडून 20,000 कोटी रुपयेपर्यंत इक्विटी भांडवल उभारणी करण्यास मान्यता दिली आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीला 5G आणि 4G सेवा मजबूत करण्यासाठी निधीची गरज आहे. सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीवर 2.1 लाख कोटी रुपये कर्ज आहे. या कंपनीला मागील काही तिमाहीपासून जबरदस्त तोटा सहन करावा लागत आहे. व्होडाफोन-आयडिया कंपनीचे मुख्य प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल असून त्याच्याकडून कंपनीला जबरदस्त स्पर्धात्मक आव्हानाना सामोरे जावे लागत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया स्टॉक 13.32 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 09 April 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x