21 November 2024 5:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो
x

HMA Agro Share Price | स्वस्त शेअरची कमाल! एका महिन्यात दिला 22 टक्के परतावा, पुढे अजून मालामाल करणार

HMA Agro Share Price

HMA Agro Share Price | एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मंगळवारी मजबूत तेजीसह वाढत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 74800 अंकावर पोहचला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22677 अंकांवर ट्रेड करत होता. निफ्टी मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक किंचित घसरणीसह ट्रेड करत होते. तर निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक मजबूत विक्रीच्या दबावात अडकले होते. ( एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश )

एचएमए ऍग्रो कंपनीचे शेअर्स मंदीच्या काळात देखील 5 टक्के वाढीसह 68.70 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3410 कोटी रुपये आहे. एचएमए ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 84 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 48 रुपये होती. आज बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के घसरणीसह 68.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 दिवसात एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये अनेक गुंतवणूकदारानी पैसे गुंतवण्यास सुरुवात केली आहे.

एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला माहिती दिली होती की, कंपनीने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 दरम्यान शेअर ट्रान्स्फर, ट्रान्समिशन, डुप्लिकेशन, नाव हटवणे, उपविभाग नूतनीकरण किंवा स्टॉक विभाजन यासारखे कोणतेही निर्णय घेतले नाहीये.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HMA Agro Share Price NSE Live 10 April 2024.

हॅशटॅग्स

HMA Agro Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x