21 November 2024 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरणार की तेजीने परतावा देणार, महत्वाची अपडेट - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Horoscope Today | 'या' राशींच्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीकरिता आजचा दिवस ठरेल फायद्याचा; पहा तुमचे भविष्य काय सांगते Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा - NSE: SUZLON गौतम अदानींनी अधिकाऱ्यांना दिली 20 कोटींची लाच, गुंतवणूकदारांचीही फसवणूक'; अमेरिकेत गुन्हा दाखल IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, स्टॉक ब्रेकआउट देणार, BUY रेटिंग - NSE: IRFC
x

Israel Vs Iran Military Power | युद्ध उफाळल्यास इराण देश इस्राईलचा माज उतरवू शकतो, अशी आहे लष्करी ताकद

Israel Vs Iran Military Powe

Israel Vs Iran Military Power | ड्रोन हल्ल्यानंतर इराणने थेट इस्रायलला आव्हान दिले आहे. मात्र, आठवडाभर या हल्ल्याची भीती व्यक्त केली जात होती. इराणने आपल्या दूतावासावर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे इस्रायल इतक्या सहजासहजी शरणागती पत्करणार नाही. कोणत्याही हल्ल्यावर गप्प न बसण्याचा इस्रायलचा इतिहास आहे.

याचे ताजे उदाहरण गाझा पट्टीत हमाससह निरपराधांच्या नरसंहारातून समजू शकते. हल्लेखोराला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलसोबत अमेरिका आणि ब्रिटनही दिसत आहेत. दोन्ही देशांमधील युद्ध अद्याप सुरू झालेले नाही, मात्र तणावानंतर युद्धाची भीती वाढली आहे.

कोणत्याही युद्धाचे समर्थन करत नसलो तरी सध्या जी परिस्थिती निर्माण होत आहे ती जगाची चिंता वाढवणारी आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध झाले तर कोण जिंकणार? येथे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. लष्करी मनुष्य बळ, संरक्षण बजेट, सैनिकांची संख्या, हवेपासून जमिनीपर्यंत आणि समुद्रापर्यंत कोण शक्तिशाली आहे? त्यावर जाणून घेऊ.

संरक्षण बजेट
‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, संरक्षण बजेटच्या बाबतीत इराण इस्रायलच्या मागे आहे, तर सैनिकांच्या संख्येच्या बाबतीत इराण इस्रायलपेक्षा खूप पुढे आहे. रिपोर्टनुसार, इस्रायलचे संरक्षण बजेट 24.2 अब्ज डॉलर आहे, तर इराणचे संरक्षण बजेट 9.9 अब्ज डॉलर आहे.

लढाऊ विमानं आणि रणगाडे
हवाई शक्तीच्या बाबतीत इस्रायलकडे 612 तर इराणकडे 551 विमाने आहेत. मात्र, रणगाड्यांच्या बाबतीत इराणकडे इस्रायलपेक्षा दुप्पट ताकद आहे. इस्रायलकडे 2200 तर इराणकडे 4071 रणगाडे आहेत.

समुद्रात इराण शक्तिशाली
समुद्राच्या लष्करी सामर्थ्यातही इराण इस्रायलच्या पुढे आहे. इस्रायलकडे 67, तर इराणकडे 101 युद्धनौका आहेत. याशिवाय इस्रायलकडे 43 हजार बख्तरबंद वाहने आहेत, तर इराणकडे 65 हजार बख्तरबंद वाहने आहेत.

लष्करी मनुष्य बळ
सैनिकांच्या संख्येच्या बाबतीतही इराणने इस्रायलला मागे टाकले आहे. इस्रायलकडे 1.73 लाख सैनिक आहेत, तर इराणकडे 5.75 लाख सक्रिय सैनिक आहेत. याशिवाय इस्रायलकडे 4.65 लाख राखीव सैनिक आहेत, तर इराणकडे 3.50 लाख राखीव सैनिक आहेत.

अणुबॉम्ब – येथे इराण पेक्षा इस्रायल भारी
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलकडे सध्या ८० अणुबॉम्ब आहेत, तर इराणकडे अधिकृतपणे एकही अणुबॉम्ब नाही. अणुबॉम्बच्या आधारे इस्रायल इराणपेक्षा खूप पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, इराणने मोठ्या प्रमाणावर युरेनियमचा साठा केल्याचे वृत्त अमेरिकन वृत्तपत्रांनी दिले होते. जे तो अणुबॉम्ब बनवताना करत आहे. याशिवाय युरेनियमपासून ही शस्त्रास्त्रे अद्ययावत करत आहेत.

इस्रायलच्या सामर्थ्यावर एक नजर
दिसायला छोटा पण अतिशय शक्तिशाली देश असलेल्या इस्रायलची शक्ती कोणापासूनही लपून राहिलेली नाही. इस्रायलकडे अद्ययावत लढाऊ विमाने, आयर्न डोमसारखी आधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा आहे. इस्रायलकडे आयडीएफसारखी जगातील सर्वात शक्तिशाली सेना आहे. सायबर युद्धात लक्षणीय गुंतवणूक करून इस्रायलचे लष्कर तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहे. पण, तज्ज्ञ असं सांगतात की अमेरिकेच्या डोळेझाकुन मिळणाऱ्या मदतीमुळे इस्रायल देश अधिक युद्धखोर भाषा वापरतो आणि प्रगत देशाकडून मिळणारी मदत देखील त्यांना अधिक चिथावणीखोर बनवते असं तज्ज्ञ सांगतात.

इराणच्या सामर्थ्यावर एक नजर
दुसरीकडे इराणकडे लष्करी शक्ती आणि शस्त्रास्त्रांचा साठा आहे. इराण आपल्या शत्रूंसाठी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांवर अधिक अवलंबून आहे. संपूर्ण आखातात इराणचे वर्चस्व आहे. गेल्या काही वर्षांत ड्रोन आणि सायबर क्षमता वाढविण्याकडे खूप लक्ष दिले आहे.

News Title : Israel Vs Iran Military Power Facts 14 April 2024.

हॅशटॅग्स

#Israel Vs Iran Military Powe(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x