22 November 2024 11:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Suzlon Share Price | 1 वर्षात 416% परतावा देणारा शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र शेअर बाजारातील तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म आनंद राठीने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर 49 रुपये टार्गेट प्राईस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे मार्च 2024 तिमाहीचे निकाल मजबूत असण्याची शक्यता आहे. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 40.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तज्ञांच्या मते, मार्च तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीची पवन ऊर्जा टर्बाइन वितरणाची क्षमता 313 मेगावॅटवर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नात मजबूत वाढ होण्याची शक्यता आहे. आनंद राठी फर्मच्या मते, भारत सरकारने आपल्या महत्त्वाकांक्षी विकास योजनांमध्ये पवन ऊर्जा क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केल्याने सुझलॉन एनर्जी कंपनीला फायदा होऊ शकतो. म्हणून तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 49 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

भारताच्या विंड टर्बाइन व्यावयात सुझलॉन एनर्जी कंपनीचा वाटा 32 टक्के आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.50 टक्क्यांच्या घसरणीसह 42.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 6.85 टक्के वाढले आहेत. तर मागील सहा महिन्यांत हा स्टॉक 50 टक्के वाढला आहे.

YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 416 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.72 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 7.91 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 57,398.73 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 16 April 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x