23 November 2024 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीने पुढील आठवड्यात 10-11 रुपये प्राइस बँडवर 18,000 कोटी रुपये मूल्याची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे संचालक मंडळ आणि शेअरधारकांच्या मंजुरीनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

व्होडाफोन आयडिया कंपनीचा FPO 18 एप्रिल ते 22 एप्रिल 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. अँकर गुंतवणूकदार 16 एप्रिल रोजी FPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 3.80 टक्के घसरणीसह 12.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जेएम फायनान्शिअल फर्मने 12 एप्रिल रोजी एक अहवाल जाहीर करून माहिती दिली की, व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सचे मूल्य सध्याच्या बाजारभावानुसार घटले आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्सवर सेल कॉल देऊन स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. CLSA फर्मने 10 एप्रिल 2024 रोजी एका अहवालात व्होडाफोन आयडिया स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग देऊन बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 5 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

12 एप्रिल 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 12.96 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 113 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 6 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 23 टक्के कमी झाली आहे.

मागील सहा महिन्यांत व्होडाफोन आयडिया स्टॉक 10 टक्के मजबूत झाला आहे. व्होडाफोन आयडिया ही कंपनी सेल्युलर आणि फिक्स्ड लाइन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी S&P BSE 200 निर्देशांकामध्ये ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 16 April 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(124)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x