23 November 2024 4:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

IREDA Share Price | IREDA शेअर्स 30 टक्क्यांची उसळी घेणार? तज्ज्ञांनी जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात तीन म्युच्युअल फंड कंपन्यानी आयआरईडीए कंपनीमधील आपली गुंतवणूक कमी केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 9 टक्के घसरणीसह 153.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )

आयआरईडीए कंपनीचे शेअर्स नोव्हेंबर 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO शेअर्सची इश्यू किंमत 32 रुपये होती. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यावर या कंपनीने 214 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 1.20 टक्के वाढीसह 160.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च फर्मने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, कोटक म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड या तीन दिग्गज म्युच्युअल फंड कंपन्यांनी आयआरईडीए कंपनीमधील आपली गुंतवणूक कमी केली आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत विविध 15 म्युच्युअल फंड हाऊसने आयआरईडीए कंपनीचे 2.87 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

आयआरईडीए कंपनीचा IPO सूचीबद्ध झाल्यावर भारत सरकारकडे कंपनीचे 75 टक्के भाग भांडवल शिल्लक राहिले आहे. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी कंपनीचे 1.88 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांनी कंपनीचे 17 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

आयआरईडीए कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सर्वाधिक कर्ज वितरण केले आहे. या कंपनीने मागील आर्थिक वर्षात 37,354 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यास मंजुरी दिली होती. तर 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीने 25,089 कोटी रुपये प्रत्यक्ष कर्ज वितरित केले आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 210 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 16 April 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x