11 December 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल

Voltas Share Price

Voltas Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होल्टास कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1365 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. ( व्होल्टास कंपनी अंश )

नुकताच ग्लोबल ब्रोकरेज हाऊस UBS ने व्होल्टास कंपनीच्या शेअर्सची रेटिंग अपग्रेड केली आहे. यूबीएस फर्मने व्होल्टास कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, व्होल्टास कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1800 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी व्होल्टास स्टॉक 1.21 टक्के वाढीसह 1,399.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस UBS ने व्होल्टास कंपनीच्या शेअर्सची रेटिंग न्यूट्रल वरून अपग्रेड करून बाय अशी केली आहे. ब्रोकरेज हाऊसने या कंपनीच्या व्होल्टास कंपनीच्या शेअर्सची टार्गेट किंमत मजबूत वाढवली आहे. UBS फर्मने व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्ये 1800 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 38 टक्के अधिक वाढू शकतो, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

मागील 6 महिन्यांत व्होल्टास कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 67 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 23 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 818.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1365 रुपये किमतीवर पोहोचले होते. 2024 या वर्षात व्होल्टास स्टॉक 40 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

मागील एका महिन्यात व्होल्टास कंपनीच्या शसर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1373.20 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 745 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Voltas Share Price NSE Live 23 April 2024.

हॅशटॅग्स

#Voltas Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x