15 December 2024 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11.60 टक्क्यांच्या वाढीसह 179.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात आयआरईडीए स्टॉक 64.12 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )

आयआरईडीए कंपनीचा IPO 32 रुपये किमतीवर आला होता. या IPO किमतीवरून हा स्टॉक 436.72 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. आज बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 167.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 215 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 20.12 टक्क्यांनी खाली आले आहेत. आर्थिक वर्ष 2023-2024 च्या मार्च तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 337.38 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 253.62 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत कंपनीने 34.29 टक्के वाढीसह 1391.64 कोटी रुपये ऑपरेशनल महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,036.32 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मार्च तिमाहीत आयआरईडीए कंपनीचे कर्ज इक्विटी गुणोत्तर 6.77 वरून कमी होऊन 5.80 वर आले आहे. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकमध्ये 185 रुपये किमतीजवळ मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. टिप्स 2 ट्रेड्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकमध्ये 184 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. तर 163 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक सपोर्ट लेव्हलच्या खाली आला तर शेअर 140 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकची सपोर्ट किंमत 163 रुपयेवर असून आणि रेझिस्टन्स लेव्हल 184 रुपये किमतीवर आहे. जर हा स्टॉक 184 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यासाठी या स्टॉकची ट्रेडिंग रेंज 152 ते 215 रुपये दरम्यान असेल. आयआरईडीए ही कंपनी मिनीरत्न दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे, जी नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 24 April 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x