24 November 2024 10:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात. ब्रोकरेज फर्म नुवामाच्या तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी भारती एअरटेल कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के घसरणीसह 1,324.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज फर्म नुवामाने भारती एअरटेल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, भारती एअरटेल स्टॉक अल्पावधीत 1580 रुपये किमतीवर जाऊ शकतो. यासह ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सवर ‘होल्ड’ रेटिंग देऊन 14 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 3.24 टक्के घसरणीसह 13.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुवामा फर्मच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आपले टॅरिफ 10 टक्के वाढवू शकते. तसेच 2025-26 मध्ये त्यात आणखी 10 टक्के वाढ करू शकते. पुढील काही वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनीने 40,000 कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनी आणखी 25000 कोटी रुपये कर्ज उभारणार आहे. याशिवाय भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ कंपन्या देखील आपल्या टॅरिफ दरात वाढ करणार आहेत. नुकताच Vodafone Idea कंपनीने आपला FPO लाँच केला होता, त्याला गुंतवणूकदारांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of Vodafone Idea Share Price 26 April 2024.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x