18 November 2024 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा

Bonus Shares

Bonus Shares| आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअर्सवर 3 बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने अद्याप बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाहीये.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.74 टक्क्यांच्या घसरणीसह 640.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 663 रुपये होती. आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.71 टक्के वाढीसह 629.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीने 1 शेअर्सवर 3 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने अद्याप बोनस शेअर्सची पात्रता निश्चित करण्याची रेकॉर्ड डेट घोषित केलेली नाहीये. या वर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 14 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप केला होता. मागील पाच वर्षांत आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना एकूण 56 रुपये लाभांश वाटप केला आहे.

आर्थिक वर्ष 2023-2024 च्या मार्च तिमाहीत आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीचा एकत्रित नफा 723 कोटी रुपये नोंदवला गेला होता. एका वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीने 165 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीने 1,027 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तो आता वाढून 2,141 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. या कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न 261 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

निधी ग्रॅनाइट्स कंपनीच्या संचालक मंडळाने देखील आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. निधी ग्रॅनाइट्स कंपनी आपल्या शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. यासाठी कंपनीने 2 मे हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 267.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 281.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares for investment 29 April 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x