14 November 2024 11:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, रेटिंग अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IDEA Horoscope Today | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा राहील, जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा सल्ला काय - NSE: SUZLON IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल तगडा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC Smart Investment | श्रीमंतीचा महामंत्र पहाच, म्युच्युअल फंडातून कमवाल पैसाच पैसा आणि पैशाने पैसा वाढवा - Marathi News Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK
x

NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6.20 टक्के वाढीसह 144.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित घसरले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 265.90 टक्के नफा कमावून दिला आहे. ( एनबीसीसी कंपनी अंश )

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 123 टक्के परतावा कमावून दिला आहे. सिव्हिल कन्स्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या एनबीसीसी कंपनीने दुबईमध्ये पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे. आज मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी एनबीसीसी स्टॉक 0.95 टक्के घसरणीसह 140.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात एनबीसीसी कंपनीच्या शेअर्समध्ये 1.1 च्या बीटासह उच्च अस्थिरता पाहायला मिळाली आहे. एनबीसीसी स्टॉकचा RSI 60.2 अंकावर आहे. त्यावरून कळते की स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. एनबीसीसी स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस, 200 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेज किंमत पातळीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. एनबीसीसी कंपनीचे बाजार भांडवल 25,911 कोटी रुपये आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एनबीसीसी कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 60.2 टक्के वाढीसह 110.7 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात कंपनीचा नफा 69.1 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 2023-24 च्या डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 13 टक्के वाढीसह 2,412.6 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत कंपनीने 2135 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

एनबीसीसी इंडिया लिमिटेड ही कंपनी मुख्यतः प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आणि इंजिनिअरिंग प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन संबंधित व्यवसाय करते. ही कंपनी नागरी बांधकाम प्रकल्प, राष्ट्रीय सुरक्षेसाठी पायाभूत सुविधांची कामे, नागरी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा प्रकल्प आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनासाठी प्रकल्प अंमलबजावणी आणि पूर्वोत्तर विभागातील विकासात्मक कामे देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NBCC Share Price NSE Live 30 April 2024.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x