23 November 2024 4:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार?

Reliance Home Finance Share Price

Reliance Home Finance Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असलेले अनिल अंबानी यांच्या काही कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. यामधे रिलायन्स होम फायनान्स कंपनी देखील आहे. पूर्वी या कंपनीचे शेअर्स 110 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनी अंश )

आता हा स्टॉक 5 रुपयेच्या खाली आला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी रिलायन्स होम फायनान्स स्टॉक 1.16 टक्के घसरणीसह 4.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 6.22 रुपये होती. नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटीने रिलायन्स होम फायनान्सम कंपनीमधील व्यावसायिक आणि ऑडिट संबंधित अनियमिततेसाठी ऑडिट कंपनी आणि दोन ऑडिटर्सना 1.6 कोटी रुपयेचा दंड आकारला आहे.

NFRA ने आपल्या निवेदनात माहिती दिली की त्यांनी, धीरज अँड धीरज कंपनीच्या लेखापरीक्षण कामात अनियमितता आढळल्याने त्यांच्यवर 1 कोटी रुपये दंड आकारला आहे. आणि पीयूष पाटणीला 50 लाख रुपये तसेच पवन कुमार गुप्ताला 10 लाख रुपये दंड आकारला आहे.

पवन कुमार गुप्ता हे मुंबईतील ऑडिट फर्म धीरज अँड धीरज कंपनीचे भागीदार आहेत. यासह आर्थिक अहवाल नियामकाने पाटणी आणि गुप्ता यांना लेखा परीक्षक म्हणून काम करण्यापासून किंवा आर्थिक स्टेटमेंट्स किंवा अंतर्गत लेखापरीक्षणासंदर्भात दोघांना अनुक्रमे पाच वर्षे आणि तीन वर्ष लेखापरीक्षण कामकाज करण्यास बंदी घातली आहे.

रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनीच्या 2018-19 च्या लेखापरीक्षणात अनियमितता आढळली होती. या कामात पाटणी हे एंगेजमेंट पार्टनर आणि गुप्ता हे एंगेजमेंट क्वालिटी कंट्रोल रिव्ह्यू पार्टनर म्हणून काम करत होते. यापूर्वी प्राइस वॉटरहाऊस अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट्स LLP यांना रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे ऑडिटर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. परंतु प्राइस वॉटरहाऊस कंपनीने हे काम पूर्ण न करता जून 2019 मध्ये ऑडिटरमधून माघार घेतली.

याशिवाय वॉटरहाऊस कंपनीने 31 मार्च 2019 रोजी रिलायन्स होम फायनान्स कंपनीमध्ये 7,900 कोटी रुपये कर्जाशी संबंधित फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड कंपनीची वैधानिक लेखा परीक्षक म्हणून धीरज अँड धीरज कंपनीला नियुक्त करण्यात आले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Home Finance Share Price NSE Live 02 May 2024.

हॅशटॅग्स

Reliance Home Finance Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x