
Adani Gas Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीने मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात तब्बल 71.6 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2023 तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीने 97.9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर आता मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 168 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( अदानी टोटल गॅस कंपनी अंश )
कंपनीचे महसूल संकलन 4.7 टक्के वाढीसह 1167 कोटी रुपयेवर पोहचले आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत या कंपनीने 1114.8 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आज गुरूवार दिनांक 2 मे 2024 रोजी अदानी टोटल गॅस स्टॉक 1.39 टक्के वाढीसह 942.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
अदानी टोटल गॅस कंपनीची प्रति शेअर कमाई म्हणजे EPS आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत 1.53 रुपये नोंदवला गेला आहे. आर्थिक वर्ष 2023 मार्च तिमाहीत कंपनीचा EPS 0.89 रुपये होता. मार्च 2024 तिमाहीत अदानी टोटल गॅस कंपनीचा EBITDA 47.6 टक्के वाढीसह 2991 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
अदानी टोटल गॅस कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना 1 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. लाभांश वाटप करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून 14 जून 2024 हा दिवस निश्चित केला आहे. मंगळवारी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के वाढीसह 928.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.02 लाख कोटी रुपये आहे.
अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,259.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 521.95 रुपये होती. व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, अदानी टोटल गॅस स्टॉक पुढील काळात 1340 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. त्यामूळे त्यांनी स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. Ventura फर्मच्या मते, आर्थिक वर्ष 2023 ते 2026 दरम्यान, अदानी टोटल गॅस कंपनीच्या EBITDA आणि महसुलात अनुक्रमे 25.3 टक्के आणि 39.9 टक्के दराने वाढ होऊ शकते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























