23 November 2024 10:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. लवकरच आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. कमी उत्पन्न असलेल्या लोकांना गृहकर्ज देणारी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी 8 मे रोजी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 3,000 कोटी रुपये आहे. ( आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी अंश )

आपल्या IPO अंतर्गत आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी 1,000 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स इश्यू करणार आहे. आणि उर्वरित शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले जातील. OFS द्वारे आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी 6.35 कोटी शेअर्स विकून 2,000 कोटी भांडवल उभारणी करणार आहे. हे 2,000 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स BCP Topco या प्रवर्तक कंपनीद्वारे विकले जाणार आहे. BCP Topco हा ब्लॅकस्टोन समूहाच्या संलग्न संस्थांद्वारे व्यवस्थापित केलेला जाणारा फंड आहे. आधार हाऊसिंग फायनान्स कंपनीमध्ये त्यानी 98.72 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

आधार हाउसिंग फायनान्स कंपनीचा IPO 8 मे 2024 ते 10 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. 15 मे रोजी या कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जातील. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची इश्यू किंमत 300 ते 315 रुपये निश्चित केली आहे. आधार हाउसिंग फायनान्स कंपनीचे अनलिस्टेड शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहेत.

आधार हाउसिंग फायनान्स कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 47 शेअर्स ठेवले आहेत. 315 रुपये या अप्पर बँडनुसार किरकोळ गुंतवणूकदारांना 1 लॉट खरेदी करण्यासाठी किमान 14,805 गुंतवणूक करावी लागेल. किरकोळ गुंतवणूकदार कमाल 13 लॉटसाठी बोली लावू शकतात. यासाठी त्यांना कमाल 199,892 रुपये जमा करावे लागतील. आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने आपल्या IPO पैकी कमाल 50 टक्के वाटा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवला आहेत.

याशिवाय 35 टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. उर्वरित 15 टक्के वाटा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, आधार हाउसिंग फायनान्स कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 130 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स 445 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP Aadhar Housing Finance Ltd 03 May 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(132)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x