23 November 2024 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. 2 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 6.5 टक्के वाढीसह व्यवहार करत होते. आज देखील हा स्टॉक तेजीत वाढत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल स्टॉक किंचित वाढीसह 283.45 रुपये किमतीवर ओपन झाला होता. काही वेळात हा स्टॉक 6.5 टक्क्यांच्या वाढीसह 300.20 रुपये किमतीवर पोहोचला होता. आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 6.92 टक्के वाढीसह 312.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी अंश )

बीएचईएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.01 लाख कोटी रुपये आहे. 30 एप्रिल रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले की, कंपनीने रेल्वे सिग्नलिंग व्यवसायासाठी HIMA Middle East FZE, दुबईसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. ही कंपनी जर्मनीस्थित HIMA Paul Hildebrandt GMBH कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. बीएचईएल कंपनी भारतीय रेल्वेला लोकोमोटिव्ह, EMU/MEMU साठी इलेक्ट्रिक, प्रोपल्शन सिस्टम, ट्रॅक्शन मोटर्स, ट्रॅक्शन अल्टरनेटर, ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मर इत्यादींचा पुरवठा करण्याची जबाबदारी पार पडणार आहे.

HIMA ही कंपनी रेल्वे आणि प्रक्रिया उद्योगांचे काम करणारी जगातील अग्रणी सेवा प्रदाता मानली जाते. बीएचईएल कंपनीची आणि HIMA कंपनीची भागीदारी भारतीय रेल्वेच्या विकासात मोठा हातभार लावणार आहे. मागील एका वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 258 टक्के परतावा कमावून दिला आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीत बीएचईएल कंपनीने 5,503.81 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या कालावधीत कंपनीने 162.77 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2024 च्या अखेरीस बीएचईएल कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 63.17 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 36.83 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 03 May 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x